Sunday 3 March 2013

पाऊस आटलेला



२०१२ च्या पावसाला समर्पित...

[मागल्या वर्षीचा पाऊस मला थेंब अन थेंब आठवतो;
अजून सुद्धा पावसासाठी(पावसावर) मी विडंबन लिहितो..]

पाऊस आटलेला, माझ्या शहरावरी हा 
नाहीच भास आता,कुठल्याच पावलांचा.

गवतास थेंब सारे बिलगून नसलेले,
निथळतील रे कधी ते?
तळवा भिजेना कुणाच्या... कुठल्याच पावलांचा.
पाऊस आटलेला...

पाउलवाट सारी रात्री तशीच होती,
विसरेल रे कशी ती?
उमटेना ठसा कुणाच्या... कुठल्याच पावलांचा.
पाऊस आटलेला...

पाऊस थांबलेला, कोकणामधी कधीचा,
बरसेल का इथे हा?
मातीस गंध नाही...कुठल्याच पावलांचा.
पाऊस आटलेला...

No comments:

Post a Comment