Sunday 3 March 2013

वेचलेली फुले...



   * ज्या डोळ्यांनी तू प्रतिबिंबांना शरण जातोस त्यांना स्वतःचे रूप पाहायला देखील एका प्रतिबिंबाचीच गरज असते.

   फुल म्हणजे एक साक्षात्कार आहे हे समजायला अहंकार विसरावा लागतो.

   * प्रतिस्पर्ध्याला समजेल अशी भाषा वापरण्याचे सामर्थ्य नसेल तर शहाण्याने आपले सत्य खपवायला तिथे जाऊच नये.

   * आयुष्याचा एक क्षण जरी उरलेला असला तरी, पूर्ण सत्य समजले असे म्हणणे उद्धटपणाचे आहे. त्या शेवटच्या क्षणातही पूर्वकल्पनांचा विध्वंस होऊ शकतो.   
                                              
    - (जी. ए. कुळकर्णी)  


No comments:

Post a Comment