Tuesday 21 May 2013

Cinema Paradiso



८० च्या दशकातील इटली... सुप्रसिद्ध सिने-दिग्दर्शक Salvatore उशिरा घरी परतलाय... त्याच्या आईचा फोन आलेला त्याला समजतं... कुणीतरी Alfredo नावाचा इसम निधन पावल्याची खबर असते. गेली ३० वर्षं तो गावी गेला नाहीये... गावाकडील सर्व आठवणी आणि जुने संबंध जणूकाही त्याने पुरले आहेत. परंतु Alfredo मरण पावल्याच्या बातमीने त्या सगळ्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या व्हायला लागतात...
Flashback…!!! Giancaldo  नावाचे इटली मधील एक गाव... दुसरे विश्वयुद्ध नुकतेच संपले आहे... सहा वर्षाचा Salvatore अतिशय खोडकर व चुणचुणीत मुलगा... युद्धात त्याचे वडील शहीद झाले आहेत... छोट्या Salvatore ला सिनेमा बद्दल विलक्षण आकर्षण... गावातल्या एकमेव Cinema Paradiso नावाच्या चित्रपटगृहाभोवताली तो सदा घुटमळत असे... तिथे projectionist म्हणून काम करणाऱ्या Alfredo नामक व्यक्तीशी त्याची गट्टी जमते. Alfredo Salvatore चे संबंध बाप-लेका सारखे असतात... म्हणूनच की काय, Projector Room मधून सिनेमा बघायची Salvatore ला पूर्ण मोकळीक असते. Cinema Paradiso ही लोकांसाठी फार जिव्हाळ्याची जागा... सिनेमा ह्या माध्यमावर त्या लोकांचे अतिशय प्रेम असतं परंतु तिथे प्रदर्शित झालेल्या कुठल्याही चित्रपटाला censor चे शुक्लकाष्ठ मागे लागलेलं असतं. चित्रपटाच्या रिळेतून romantic scenes काढून टाकण्याचे आदेश तिथल्या धर्मगुरूने दिलेले असतात. तसल्या रिळांचा room मध्ये खच पडून असतो. सुरुवातीला Alfredo ला Salvatore म्हणजे एक प्रकारची ब्यादच वाटत असते पण हळूहळू त्याला Projector कसा हाताळायचा ते शिकवायला Alfredo सुरुवात करतो.
एक दिवस दुर्दैवाने Cinema Paradiso ला आग लागते... Nitrate Film चा जमाना तो... film रीळ Alfredo च्या चेहऱ्या जवळ फुटल्याने त्यात त्याचे डोळे जातात. Salvatore त्याला कसाबसा वाचवतो. Cinema Paradiso आता पुन्हा कसं उभारायचं हा प्रश्न असतो... Lottery जिंकलेला Ciccio  नव्याने थिएटर बांधायचं ठरवतो... Salvatore जरी वयाने लहान असला तरी त्याची Projectionist म्हणून नेमणूक होते... कारण त्याच्याशिवाय दुसऱ्या कुणालाच त्याबाबत माहिती नसते.
अशीच वर्षं निघून जातात...
Salvatore आता तरुण झालाय... Film making निगडीत त्याचे काही ना काही प्रयोग सुरु असतात. म्हणून काम करता करता सिनेमा आणि ‘Romance’ बद्दलचे त्याचे आकर्षण वाढत जाते.
एकीकडे Salvatore च्या स्वतःच्या प्रेम कहाणीचा शुभारंभही झालेला असतो... Elena नावाच्या मुलीवर त्याचे प्रेम जडते... Elena ही गावातल्या अतिश्रीमंत व्यक्तीची मुलगी... अर्थातच तिच्या बापाचा या प्रेम प्रकरणाला विरोध असतो... काही कारणास्तव Elena व तिचे कुटुंब दुसऱ्या गावी स्थलांतरित होतात. Salvatore साहजिकच खजील होतो... त्याने लिहिलेली प्रेम पत्रं कधीच Elena पर्यंत पोहचत नाही... कायम Undeliveredअसा शिक्का लावून परतवली जातात. Alfredo Salvatore ला हे गाव सोडून जाण्याचा सल्ला देतो... ‘तुझी स्वप्नं, आकांक्षा इथे कधीही पूर्ण होणार नसून तुला उंच भरारी घ्यायची असेल तर हे गाव सोडावे लागले... ह्या गावाची नुसती आठवण देखील येता कामा नये... इथल्या लोकांना विसरून जा... आणि मागे वळून न बघता तू येथून निघून जा... आयुष्य घडव’ अशा शब्दांत जणूकाही Alfredo आदेशच देतो.
Salvatore Alfredo चा शब्द न शब्द पाळतो... Salvatore गावी परततो तो ३० वर्षानंतर... Alfredo च्या अंत्य संस्काराच्या दिवशी... गुरु समान असणाऱ्या आवडत्या Alfredo ला शेवटचा निरोप देण्यासाठी...
Giancaldo गाव आता बऱ्या पैकी सुधारलंय... परंतु तरीही Salvatore ला हे पटतं की ह्या गावात राहून सिनेक्षेत्रात हवं तसं career आपण घडवू शकलो नसतो. Salvatore Alfredo च्या विधवा पत्नीस भेटायला जातो. Alfredo ची पत्नी जुन्या आठवणींना उजाळा देते आणि Salvatore ला सांगते की त्याच्या चित्रपट क्षेत्रातील यशाबद्दल Alfredo ला सदैव अभिमान वाटत असे. Alfredo ने Salvatore साठी एक विशेष भेट जपून ठेवली असते. त्याला ठाऊक असतं की कितीही नाही म्हटलं तरी एकदा Salvatore ह्या गावात येईलच. ती खास भेट म्हणजे Films ची जुनी रीळं... Alfredo ची बायको ती रीळं Salvatore ला सोपवते.
Salvatore गावात काही दिवस मुक्कामी असताना दोन महत्वाच्या घटना घडतात...
एका ठिकाणी तरुणपणीच्या Elena सारखीच दिसणारी मुलगी बघून तो स्तब्ध होतो... ती Elena ची मुलगी असते. तिच्या मार्फत Salvatore Elena ची पुन्हा भेट होते आणि जुन्या romantic आठवणी पुन्हा जागवल्या जातात. एक चुकामूक... Salvatore Elena च्या ताटातूटीस कारणीभूत झाली असते. गाव सोडायच्या अगोदर Elena ने Cinema Paradiso मध्ये Salvatore साठी एका handbill च्या मागे सगळं लिहून ठेवलं असतं... पण Salvatore ला हे कळू शकत नाही. दोघेही त्यांच्या आयुष्यात फार पुढे निघून आले असतात... मागे वळून पाहण्याचा काही प्रश्नच नसतो... थोडक्यात, त्यांचं प्रेम पूर्णत्वास पोहचू शकत नाही... नियतीचा खेळ... आणखी काय !!
दुसऱ्या दिवशी Cinema Paradiso च्या भग्न वास्तूत Salvatore प्रवेश करतो. Projector room मध्ये वेड्यासारखी जुनी handbills तपासतो... हवं ते handbill नी त्याच्या पाठीमागे लिहिलेला Elena चा संदेश तो वाचतो... पण आता अर्थातच वेळ निघून गेली असते...
याच काळात मोडकळीस आलेली Cinema Paradiso ची इमारत पाडण्यात येते... तिथली जागा Parking करिता म्हणून वापरण्यात येणार असते... त्या दिवशी Salvatore ही तिथे जातो... ओळखीचे (म्हातारे) चेहरे त्याला तिथे दृष्टीस पडतात... Cinema Cinema Paradiso वर अमाप प्रेम करणारी ही माणसं !! अत्यंत कष्टी मनाने Cinema Paradiso ला शेवटचा निरोप देण्यात येतो... तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या मनात काय काय आठवणी जाग्या झाल्या असतील ते शब्दांत सांगणे अवघड !! कित्येक कडू-गोड घटनांची साक्षीदार असलेली ती इमारत अखेर भुईसपाट होते. खिन्न अंतःकरणाने Salvatore त्याच्या शहरात परततो.
थिएटर मध्ये Salvatore एकटा बसलाय... Alfredo ने त्याच्या साठी भेट दिलेली रीळं तो मोठ्या पडद्यावर बघतोय... ती रीळं म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक montage असतो... Cinema Paradiso मध्ये प्रदर्शित झालेल्या विविध चित्रपटांतून कापलेल्या त्या romantic scenes चा... Alfredo ची अप्रतिम भेट!!
तो montage पडद्यावरच बघावा. ते पाहून Salvatore च्या चेहऱ्यावरील आनंद आणि धन्यता लपविण्यासारखी नसतेच मूळी !!
इति “Cinema Paradiso... 
सिनेमा आणि अतूट नातेसंबंधांना वाहिलेला असा हा all-time क्लासिक... सिनेमाची सिनेमाला ‘भेट’.