Thursday 28 February 2013

वेचलेली फुले...



हळूहळू मुंबईत अंडरआर्म क्रिकेट कमीकमी होत गेलंमराठी मध्यमवर्गीय माणूस संपन्न होत गेला.
तो चाळीतून ब्लॉकमध्ये गेलाचाळी पाडल्या गेल्यागल्ल्या गाडय़ांनी भरल्याक्रिकेट रेडिओ आणि टीव्हीवर एवढं वाढलं की मुलं थेट सिझन चेंडूने खेळायला लागलीआमच्या वेळी प्रायव्हेट कोचिंग फारसं नव्हतंसाधी बॅट घ्यायला आमच्याकडे पैसे नसायचेतर किटचा प्रश्नच नाहीआठ आण्याचा रबरीचेंडू आणण्यासाठी आईच्या मायेला प्रचंड ‘आवाहन’ करायला लागायचंवडिलांना ‘वितळवणं’ शक्यच नसायचंत्यामुळे त्या गल्लीगल्लीतल्या मॅचेस्तीगर्दीत्याटाळ्याकुणीतरी चिडून पोलिसांना बोलावणं आणि त्या खिडकीमधल्या वैजयंतीसाधनामालासिन्हाही गेल्याकधीतरी ‘मुंबईबंद च्यावेळी मोकळ्या रस्त्यावर क्रिकेट उफाळून येतं;  पण त्या दिवसापुरतंत्यामुळे, ‘काचफोडल्यावर’ “स्वत:ला फरूख इंजिनीयर समजता तर शिवाजीपार्कला जाऊन खेळा,” सांगणारे गल्लीतले बर्वेकर्वेचव्हाणपवारही आता रविवारी दुपारी शांत झोपतात.
मी बऱ्याचदा त्या क्रिकेटच्या आठवणीने तळमळत असतो.

 -  (द्वारकानाथ संझगिरी)

No comments:

Post a Comment