Thursday 28 February 2013

सहोदर






Photography ची आवड मला कधी व कशी निर्माण झाली हे सांगणं अवघड आहे. कॅमेरा प्रथम हाताळला त्याला १० वर्षे तरी उलटून गेली असतील. अर्थातच त्या वेळचा तो विशिष्ट film Camera माझा नव्हताच मूळी. कॅमेरा घेईन परंतु माझ्याच पैशांनी ह्या हट्टापायी मी खूप Window Shopping केलंय. काचेच्या पलीकडे ठेवलेल्या त्या कॅमेऱ्याच्या दुकानांसमोरून जाताना पावलं आपोआप थांबायची आणि नजर वेगवेगळ्या कॅमेऱ्याच्या models वर खिळायची. कधी एकदाचे Engineering संपवून नोकरी लागतेय आणि कधी एकदाचा मी स्वतःच्या पैशांनी कॅमेरा विकत घेतोय असं व्हायचं. प्रत्यक्षात तो विकत घ्यायला बराच अवधी लागला. कुठल्यातरी पुलाखालून तोपर्यंत बरेच पाणी वाहून गेलं असेल. साधारण २ वर्षांपूर्वी माझा पहिला कॅमेरा घेतला. Point & Shoot. त्यातले controls आणि settings यांच्याशी खेळता खेळता कॅमेर्यातली मजा कळू लागली. मग घरातल्या वस्तूंचा फोटो काढण्याचा सपाटा चालवला. तांब्या-पितळी ची भांडी बंदिस्त करणं देखील सोडलं नाही.

त्यानंतर कोकणात जाणं झालं. वेड्यासारखे फोटो काढले...काही बरे तर काही वाईट. इतक्या मोठ्या प्रमाणात फोटो काढण्याची पहिलीच वेळ असल्याने स्वारी खूष होती. वर्षभरात photography बद्दल जेवढं शिकता येईल तेवढं शिकण्याचा प्रयत्न केला...दुसर्यांनी काढलेले फोटो ते इंटरनेटवर उपलब्ध असेलेल्या tips सगळं पालथं घालायचा प्रयत्न केला. Photography Magazines चाळणे सुरु केले. Point & shoot कॅमेऱ्याच्या मर्यादा लक्षात आल्या होत्या. Depth of Field म्हणजे काय ते गवसलं होतं. DSLR कॅमेर्याची गरज भासू लागली. Canon 1100D ची निवड final केली. मला ज्या बाबी अपेक्षित होत्या त्या सर्व या कॅमेर्यात होत्या. नव्या खरेदीचा आनंद कंपनीच्या बस मध्ये पेढे वाटून साजरा केला. त्या दिवसापासून आजपर्यंत थोड्याफार प्रमाणत photography केली आहे. पंढरीला जाणार्या वारकर्यांपासून ते गणेश विसर्जन मिरवणुकी पर्यंत आणि कोकणातल्या समुद्रापासून ते पुरातन शिव मंदिरांपर्यंत फोटो काढले. विविध photography websites वरील फोटो खूप काही शिकवून जातात. त्या योग्यतेची माझी photography नक्कीच नाही. रघु राय यांनी काढलेले फोटो मला नेहमीच प्रेरणादायी वाटतात. बनारसहे त्यांचं Photography Book माझ्या अतिशय आवडीचं.

पुढे lens जमवण्याची लगबग सुरु झाली. खिसा रिकामा करून zoom lens, Prime lens खिशात घातले. नवनवीन Technical गोष्टी कळू लागल्या. आजदेखील मोठ्या प्रमाणत ह्या technicalities मला पूर्ण माहित नाही. शिकणे ही खरोखर निरंतर प्रक्रियाच असते. नवं काही शिकल्याने दृष्टीकोन बदलतो. मनःचक्षुंना असाच सजगतेचा viewfinder लावल्याने आजूबाजूचं जग जरा वेगळं दिसू लागतं. एकेकाळी निव्वळ पिडा भासणारा ‘Noise’ आता कृष्ण-धवल छायाचित्रांसाठी जवळचा वाटू लागला आहे हे साध्या उदाहरणावरून स्पष्ट होतं. Photoshop या जादुई दुनियेत अजून प्रवेश केला नाहीये. हलकं फुलकं Lightroom बरं. छाया व प्रकाशाचा हा विस्मयकारी खेळ आहे. Photo-artist एवजी चांगला photographer व्हायचंय. नको तेवढी रंग रंगोटी केली की कलाकृती भडक होते. असो.

ह्या छायाचित्रकलेबद्दल कुठलेही professional aspiration नाही पण दर्जा तसा व्हायला हवा हा ध्यास नेहमीच असणार. कॅमेरा नावाचं यंत्र एक उत्तम मित्र व मार्गदर्शक कसं झालं ते कळालं सुद्धा नाही. म्हणून मी त्याला सहोदरम्हणतो. एक मात्र निश्चित की Window Shopping च्या दिवसांत असलेली ती photography आणि कॅमेर्या बद्दलची अनामिक ओढ आजही तेवढीच टिकून आहे आणि भविष्यातही असणार.

No comments:

Post a Comment